top of page
Search

चहा vs कॉफी: तो न संपणारा वाद

चहा vs कॉफी: तो न संपणारा वाद

चहा.... हा शब्द च असा आहे की तोआपल्याला टवटवीत पणाची जाणीव करून देतो. काळ वेळाचं त्याला बंधन नाही. ताजेपणा, उल्हासआणि उत्साहात भरटाकायला एक कप चहा खरंच अमृततुल्य. याउलट कॉफी... दक्षिण भारतआणि काही युवा वर्गाला आवडणार पेय. खुपजण झोपण्याच्या आधी कॉफी पिण्यावर भरदेताना दिसतात. प्रवासात असताना चारअनोळखी माणसंसुद्धा चहा पिताना एकमेकांचे मित्रबनतात. कॉफी पिणारा एकटाच कोपऱ्यात पुस्तक वाचत पडलेलाअसतो. चहा पिणाऱ्या व्यक्ती एकाच स्तरावर येऊन दिलखुलासपणे गप्पामारताना बऱ्याच टपऱ्यांवर, हॉटेलमध्ये, चाळीत, झाडाखाली, कन्स्ट्रक्शन साइट वर कुठेही दिसतील पण कॉफीवाले क्वचितच.

चहा vs कॉफी

कॉलेज कॅन्टीनमध्ये सुद्धा स्टुडंट्स टाईमपास... टवाळक्या करत कित्येक कप चहा रिचवून जातात. कॉफी पिणारा कुठेतरी कोपऱ्यातल्या कॉफी हाउसमध्ये गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला गेलेला असतो. चहाच्या कपात खरोखरच वादळ असते असं म्हणतात. "चाय पे चर्चा" कुठल्याही स्तरावर होऊ शकते. "चाय पानी " विचारणं ही आपली संस्कृती. "चहा पिल्याशिवाय जायचं नाही हं sss " हा गोड आग्रह सगळ्यांनाच भावतो. खेडेगावात सुद्धा "चला पाव्हणं च्या घेऊया की !" असं म्हटलं जात. तसं कॉफीच्या बाबतीत होताना दिसत नाही. एम.एन.सी. किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये फक्त कॉफी ब्रेकच घेतात. एकदा तुम्ही एकत्र बसून चहा घेतला की मैत्री पक्की होते, ती कधीच ब्रेक होत नाही तसं कॉफीचं होताना दिसत नाही, कॉफी ब्रेक म्हणजे......?


चहा...मनाला ताजेपणा, विचारांना चालना आणि एकमेकांचा यथायोग्य सन्मान देत मन मोकळं करण्याला प्रेरीत करणार अमृततुल्य पेय. कॉफी... फक्त काही जणांपुरती मर्यादित,गंभीर विचार करत स्वतःबद्दलची स्वप्न रंगवण्यासाठीचं कडवट पेय. चहा सगळ्यांनाच परवडतो..गरीब- श्रीमंत असा भेदभाव नाही. स्वस्त आणि पृथ्वीवरचे अमृत. बरेच गरीब लोक चहा पिऊन सुद्धा दिवस काढतात. कॉफी !!! म्हणायला अजूनही बरेच लोक बिचकतात. कॉफी हे सर्वांना परवडण्यासारखं पेय मुळीच नाही. काही प्रकारच्या एका कॉफीच्या किमतीत ४० ते ५० लोकांचा चहा होऊ शकतो. पाऊस पडत असताना किंवा थंड हवा सुटलेली असताना गरमागरम भजी बरोबर चहा तर हवाच ना ! तिथं कॉफीचा विचार येणारच नाही. कॉफी बरोबर जास्तीत जास्त काय तर केक किंवा कुकीज बस्स !


प्रत्येकाने लहानपणी ग्लुकोजची बिस्किटं चहात बुडवून खाल्ली असणार. किती वेळ बिस्किट चहात बुडवायचं? हे टेक्निक प्रत्येकालाच जमेल असं नाही पण त्याच्यात भिजलेल्या बिस्किटांची चव अजूनही रेंगाळत असणार. ब्रिटीश लोकांनी लावलेल्या सवयीनुसार अजुनही काही मंडळी दात न घासता "बेड टी" पितात... "बेड कॉफी" नाही. ट्रेनमधून प्रवास करताना ….चाय ssss गरम चाय ssss मसालेवाली चाय ssss ऐकलं की उठून कधी चहा पितो असं वाटतं पण तेच कॉफी ssss कॉफी ssss नेसकॉफी वाला आला की त्याला विचारलं जातं "कॉफी कितने की है?" त्याचं उत्तर ऐकल्यावर परत चहावाल्याची वाट पहाणे सुरु होते.


0 comments

Comments


bottom of page