सकाळी… सकाळी जॉगिंग ट्रॅकस, पार्क, बरेचशे रस्ते फिरायला जाणाऱ्या लोकांनी गजबजून जातात. व्यायामाच्या नावाखाली गप्पा, जोक्स, हसण्याचे विविध प्रकार, टाईमपास सगळं सुरू असत. व्यायाम किंवा बऱ्याच जणांसाठी थोडाफार चालणं संपलं की त्यांची पावलं एका विशिष्ठ दिशेने पडू लागतात..... फार महत्त्वाची गोष्ट करण्यासाठी…..
असं म्हणतात की,.....
'आग्र्याला जाऊन ताज महाल पाहिला नाही !'
'काश्मीरला जाऊन सफरचंद खाल्ली नाही!'
'जयपूरला जाऊन हवामहल पाहिला नाही!'
'बनारसची लवंगलता माहीत नाही!'
'पुण्याला जाऊन तुळशीबागेत गेला नाही!'
नागपूरला जाऊन "अश्विनीअमृततुल्यचा" चहा पिला नाही!
तर मग केलं तरी काय ????????????
Its a 'Chai Like Home'
मग दिवस सुरू होणार तरी कसा? त्या तिथल्या चहा मधे असं आहे तरी काय??... त्या ठिकाणी गेल्यावरच कळत.
बऱ्याच दुरून येणारा तो मंद... मंद.... हवा हवासा वाटणारा सुगंध .... आपल्याला आपल्या लहान पणात घेऊन जातो. आई, आज्जी, आत्या, मावशी, काकू यांच्या स्वयंपाक घरातून येणाऱ्या..... सुगंधा सारखा. नंतर कप-बशीत दिलेल्या चहाचा तो चिरपरिचित केशरी रंग परत या काळाची जाणीव करून देतो. गरमा-गरम वाफाळलेला चहाचा पहिला घोट घेतल्या घेतल्या आहाsss हाsss किती मस्त!! अगदी तशीच .. भन्नाट मिरपूड, लवंग, चहा, साखर, दूध, वगैरेव गैरे.. एकदम Perfect!.
चहाचा पुढचा एक… एक घोट म्हणजे ब्रह्मानंदाची टाळीच!! पहिला पाऊस अंगावर पडल्यावर झाडांना, वेलींना, फुलांना जशी तरतरी येते तसं काही संवाटायला लागतं. मनापासून दाद येते.... एकदम सुंदर! Cool! Awesome!! घरापासून दूर असूनही घराची आठवण देणारा तो चिरपरिचित स्वाद एखाद्या अमृतासारखा वाटतो आणि तो क्षण हि.. अमृततुल्यचं वाटतो.
फक्त त्या ठिकाणापर्यंत म्हणजे "अश्विनी अमृततुल्यपर्यंत" पोचलं कि झालं.
सगळ्या ऋतूमध्ये सगळ्यांसाठी इथं वेगवेगळ्या स्वादाचा चहा मिळणार याची खात्री असते. मग तो हिवाळ्यातील सगळ्यात थंड दिवस असो, पावसाळ्यातली रिमझिम सकाळ, धुवाँधार संध्याकाळ किंवा उन्हाळ्यातली कडकडीत दुपार. तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर सिलेक्ट करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. बऱ्याचं लोकांना वेलदोडा युक्त चहा प्रिय असतो... मस्त रिफ्रेशिंग वाटण्यासाठी तर काहीजण दालचिनी टाकलेल्या चमचमीत चहाचे फॅन असतात. लवंग असलेल्या चहाने घशातली खरखर बंद होणार यावर बऱ्याच मंडळींचा विश्वास आहे आणि त्यात जर आले टाकलेले असेल तर मग.. क्या बात है l
"अश्विनी अमृततुल्यमध्ये" या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक फ्लेव्हरसाठी विशिष्ठ फॉर्मुला वापरून जबरदस्त टेस्टी आणि उत्तम क्वालिटीचा चहा बनवण्यात येतो. Cleanliness आणि Hygiene विशेष फोकस असल्याचं हि जाणवतं. सगळ्यांना घरातल्या सारखाच वाटावा ... जेव्हा हवा तेव्हा मिळावा ... सर्वांच्या मनासारखा असावा ... प्रत्येक पिढीला पसंत पडावा .. असा उत्कृष्ठ चहा सगळ्यांपर्यंत पोचवायचा या संकल्पाने प्रेरित झालेलं आहे ते "अश्विनी अमृततुल्य".
कॉलेजच्या मुलांची टोळकी इथं हमखास दिसणारच कारण त्यांचा Cool मसाला चहा इथं आहे ना! ऑफिसला जाणाऱ्या मंडळींचा हा आवडता स्टॉप .. रिफ्रेश झाल्याशिवाय पुढे जाणार कसं? खेड्यापाड्यातून आलेल्या अस्सल दुधाचा चहा पिणाऱ्या गावकरी मंडळींना इथला चहा नेहमीच भावतो. Corporate World चा वर्क फोर्स इथल्या अमृतरूपी चहाच्या Energy शिवाय ऍक्टिव्हेटच होत नाही. महिलावर्ग दिवसातून एकदातरी इथं हजेरी लावताना दिसतोच. Senior Citizens सावकाश .. दमादमाने .. तब्येतीला सांभाळून इथला Healthy कमी शुगरचा खास त्यांच्यासाठी बनवलेला चहाचा स्वाद घ्यायला येताना नेहमीच दिसतात त्यांच्या आवडत्या अश्विनी अमृततुल्यला.
Comments